कुरकुरीत पेपर डोसा
पेपर डोसा 'भिडी तव्यावर' तयार केला जातो. पीठ संपूर्ण तव्यावर पातळ आणि समान रीतीने पसरवले जातो, आणि सोनेरी-तपकिरी आणि कुरकुरीत होईपर्यंत शिजवला जातो.
पेपर डोसा नारळाची चटणी आणि सांबार व्यतिरिक्त, टोमॅटो चटणी, पुदिन्याची चटणी या बरोबर सर्व्ह केला जातो.
डोसा हा एक स्वादिष्ट पदार्थ आहे. याला दक्षिण भारतातील पाककृतींमध्ये सांस्कृतिक महत्त्व देखील आहे. आता आपण डोसा बनवण्याची कृती पाहू !
साहित्य:
- २ वाटी उकडे तांदूळ
- २ वाटी तांदूळ
- १ वाटी उडीद डाळ
- १ चमचा मेथी दाणे
- १ चमचा मीठ
- १ चमचा खाण्याचा सोडा
बनवण्याची कृती:
- प्रथम तांदूळ आणि डाळ ७ ते ८ तास वेगवेगळे पाण्यात भिजत ठेवा.
- ८ तासानंतर तांदूळ आणि डाळ धुवून मिक्सर मधून बारीक वाटून घ्या.
- वाटलेल्या मिश्रणामध्ये १ चमचा मीठ आणि १ चमचा खाण्याचा सोडा घालून पीठ नीट ढवळून घ्या.
- आवश्यकतेनुसार पाणी घाला. आणि ७ ते ८ तासासाठी पीठ झाकून ठेवा.
- ८ तासानंतर पीठ छान आंबून येते.
- पीठ नीट फेटून घ्या. डोसा पॅन चांगला गरम करून घ्या.
- गॅस मंद करून तव्यावर पीठ घाला आणि गोल पातळ पसरून घ्या.
- वरून थोडं तूप लावा. वरून झाकण ठेवा.
- २ मिनिटानंतर डोसा प्लेट मध्ये काढून घ्या.
अधिक माहितीसाठी आमच्या युट्युब चॅनेलला अवश्य भेट द्या. रेसिपी आवडल्यास कमेंट मध्ये नक्की लिहा, चॅनेलला लाइक आणि सब्सक्राइब करा: https://youtu.be/LHrDD3qOR_w?si=s3Kdiok5bI3gn9pV




No comments:
Post a Comment