Thursday, 7 September 2023

घरच्या घरी बनवा मुंबईचा फेमस वडा पाव


वाडा पाव

   

 मुंबईतील काही प्रसिद्ध वडा पाव सेन्टर आहेत जे तुम्ही गूगल वर शोधू शकता.  

आता आपण वडापाव घरी कसा बनवायचा ते पाहूत्यासाठी लागणारे साहित्य आणि बनवण्याची कृती खाली देत आहे 

 साहित्य:

  • सात ते आठ उकडलेले बटाटे  
  • बेसन 
  • हळद पूड
  • तेल
  • मोहरी
  • कडीपत्ता
  • लसूण-हिरवी मिरची
  • कोथिंबीर पेस्ट
  • मीठ
  • हळद पूड  

 हिरव्या चटणीचे साहित्य:

  • वाटी कोथिंबीर
  •  ते   हिरव्या मिरच्या
  • ते लसूण पाकळ्या
  • /  वाटी पुदिना
  • अर्धा चमचा जिरे पूड 
  • चवीनुसार मीठ 

   सुकी लाल चटणीचे साहित्य:

  • / वाटी शेंगदाणे
  • ते सुक्या लाल मिरच्या 
  • / वाटी बुंदी 
  • ये  लसूण पाकळ्या
  • चवीनुसार मीठ 

बनवण्याची  कृती: 

  1. प्रथम हिरवी चटणी बनवण्यासाठी मिक्सर जार मध्ये कोथिंबीर, हिरव्या मिरच्या,      लसूण, पुदिना, जिरे पूड आणि मीठ घालून बारीक वाटून घ्या. 

हिरव्या चटणीचे साहित्य:
 

 २. नंतर  लाल सुक्या चटणी साठी शेंगदाणे आणि लाल मिरची तेलात तळून घ्या. बुंदी 
बनवून घ्या. पाणी न वापरता सर्व साहित्य मिक्सर जार  मधून बारीक वाटून घ्या. सुकी लाल चटणी करून बाजूला ठेवा.

सुकी लाल चटणीचे साहित्य:

  
  ३. आता वडे बनवण्यासाठी सात ते आठ बटाटे उकडून कुस्करून घ्या
 
   ४. कढई मध्ये १ चमचा तेल गरम करा.  त्यात १ चमचा मोहरी घाला.  मोहरी
 तडतडलयावर कडीपत्त्याची ५ ते ६ पाने घाला व तेलात चांगली परतून घ्या. 

   ५. आता ते लसूण पाकळ्या, ते हिरव्या  मिरच्या आणि थोडी कोथिंबीर घालुन
पेस्ट करून घ्या.  

  ६. नंतर चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद पूड आणि उकडून घेतलेले बटाटे घालून 
नीट मिसळून घ्या.  

  ७. २ मिनिटं झाकण ठेवून मिश्रण शिजवून घ्यामिश्रण थंड झाल्यावर लिंबाच्या
आकाराचे गोळे तयार करा. 




  ८. एका भांड्यात २ वाटी बेसन, २ चमचे तांदळाचे पीठ, चवीनुसार मीठ आणि अर्धा
 चमचा हळद पूड घाला. २ वाटी पाणी घालून जाडसर मिश्रण तयार करा.  

  ९. तयार झालेल्या पिठाच्या मिश्रणात बटाट्याचे गोळे बुडवून तेलात सोडा.  



  १०. मध्यम आचेवर बटाटे वडे सोनेरी लालसर होईपर्यंत तळून घ्या
 
  ११. हिरवी चटणी आणि सुकी लाल चटणी पावाला लावून घ्या,  त्यावर वडा ठेवून सर्व्ह करा.  

  १२. टेस्टी वडापाव तयार झाला.  अश्याप्रकारे घरच्या घरी स्ट्रीट फूडचा आनंद घ्या. 

 अधिक माहितीसाठी आमच्या युट्युब चॅनेलला अवश्य भेट द्या.  रेसिपी आवडल्यास कमेंट मध्ये नक्की लिहाचॅनेलला लाइक आणि सब्सक्राइब कराhttps://youtu.be/0cPesPJqt_M?si=xN7u55MOJW8DUTdn

 

No comments:

Post a Comment

घरच्या घरी बनवा मुंबईचा फेमस वडा पाव

घरच्या घरी बनवा मुंबईचा फेमस वडा पाव       मुंबईतील काही प्रसिद्ध वडा पाव सेन्टर आहेत जे तुम्ही गूगल वर शोधू शकता .   आता आपण ...