दुधापासून बनणारा खास गोड पदार्थ श्रीखंड
श्रीखंडाची उत्पत्ती प्राचीन भारतीय ग्रंथ, विशेषत: भागवत पुराण आणि अमरकोशात आढळते. या ग्रंथांमध्ये, "माथाणा" नावाच्या डिशचे वर्णन केले आहे, कालांतराने, ही डिश 'श्रीखंड' म्हणून ओळखली जाऊ लागली. श्रीखंड बनवण्यासाठी दह्यातील अतिरिक्त पाणी काढून चक्का बनवला जातो. नंतर चक्का आणि साखरेच्या मिश्रणामध्ये केशर, वेलची आणि ड्रायफ्रूटस घालून नीट मिसळले जाते.
श्रीखंड हा पदार्थ पाककृतीचा एक पारंपारिक भाग आहे, जो
सण आणि विशेष उत्सवांसह विविध प्रसंगी खास बनवला जातो. श्रीखंड हे पुरी किंवा चपाती सारख्या पदार्थांसोबत सर्व्ह केले जाते.
सुरुवातीला आपण श्रीखंड बनवण्याची पद्धत पाहूया. त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे घेऊ.
साहित्य:
- १ किलो दही
- 1 वाटी चक्का
- १ वाटी पिठीसाखर
- १ चमचा वेलची पूड
- काजूगर
- बदाम
- पिस्ता
- केशर
- प्रथम दही एका स्वछ सुती कपड्यामध्ये ओतून घ्या.
- घट्ट बांधून लटकत ठेवा.
- दह्यातील अतिरिक्त पाणी काढण्यासाठी, दही ७ ते ८ तास लटकवून ठेवा किंवा कपड्यावर वजन ठेवा.
- संपूर्ण पाणी गाळल्यानंतर तयार चक्का एका भांड्यात काढून घ्या.
- १ किलो दह्यापासून १ वाटी चक्का बनतो.
- आता तयार चक्क्यामध्ये पिठीसाखर आणि वेलची पूड घालून नीट मिसळून घ्या.
- २ ते ३ मिनिट मिश्रण नीट फेटून घ्या.
- नंतर केशर आणि ड्रायफ्रूट घालून २ ते ३ तास फ्रीझ मध्ये ठेवा.
अशा प्रकारे घरगुती पद्धती ने बनवलेले श्रीखंड हे आरोग्यासाठी योग्य पर्याय ठरू शकते.
अधिक माहितीसाठी आमच्या युट्युब चॅनेलला अवश्य भेट द्या. रेसिपी आवडल्यास कमेंट मध्ये नक्की लिहा, चॅनेलला लाइक आणि सब्सक्राइब करा:https://youtu.be/TA3hdhSdkuA

No comments:
Post a Comment