सर्वांच्या आवडीचा गोड पदार्थ उकडीचे मोदक

उकडीचे मोदक (Ukadiche Modak) म्हणजे एक प्रमुख महाराष्ट्रीय विशेषत: गणेश चतुर्थीसाठी तयार केलेले विशिष्ट प्रकारची पाककृती आहे. मोदकाला पुराणापासूनचे खुप धार्मिक महत्व आहे. गणपतीला मोदक खुप प्रिय आहेत. त्यामुळे गणपतीला नेहमी मोदकाचाच नेवेद्य दिला जातो.
सुरुवातीला आपण उकडीचे मोदक बनवण्याची पद्धत पाहूया. त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे घेऊ.
- १ वाटी किसलेलं ओलं खोबर
- १ वाटी किसलेलं गूळ
- १ वाटी तांदळाचं पीठ
- १ वाटी पाणी
- १ चमचा तूप
- १/२ चमचा वेलची पूड
- मीठ
- प्रथम मोदकाच्या सारणासाठी एका भांड्यात खोबर आणि गूळ घालून शिजवून घ्या.
- मिश्रण थोडं घट्ट झाल्यावर वेलची पूड घालून गॅस बंद करा.
- मोदकाचं सारण थंड होऊ द्या.
- आता एका टोपामध्ये १ वाटी पाणी गरम करायला ठेवा.
- पाणी गरम झालं कि त्यात १ चमचा तूप आणि १/२ चमचा मीठ घाला.
- आता १ वाटी तांदळाचं पीठ घालून नीट ढवळून घ्या.
- आणि झाकण ठेवून १० मिनिट ठेवा.
- १० मिनिटानंतर पीठ मऊ होईपर्यंत मळून घ्या.
- आता लिंबाच्या आकारा एवढं पीठ घेऊन गोल लाटून घ्या.
- मधोमध सारण ठेवून सर्व कडा एकत्र करून मोदक तयार करा.
- अश्या प्रकारे सर्व मोदक तयार करून घ्या. तयार मोदक १५ मिनिट वाफवून घ्या. उकडीचे मोदक तयार !
अधिक माहितीसाठी आमच्या युट्युब चॅनेलला अवश्य भेट द्या. रेसिपी आवडल्यास कमेंट मध्ये नक्की लिहा, चॅनेलला लाइक आणि सब्सक्राइब करा: https://youtu.be/v7lYBitl64M
No comments:
Post a Comment