कोकणची ओळख तांदळाचे घावणे नीर डोसा
घावणे हा कोंकणातली पदार्थांच्या यादीतील एक महत्त्वाचा पदार्थ . याची बनवण्याची पद्धत खुपच सोपी आहे. हा पदार्थ विशेषतः सकाळच्या नाश्ता पासून ते दुपारच्या व रात्रीच्या जेवणांत याच समावेश केला जातो. घावणे चटणी सोबत किंवा एखाद्या ग्रेव्ही भाजी सोबत सर्व्ह करू शकता. घावणे बनल्या नंतर ते जाळीदार पांढरे शूभ शुभ्रर दिसणे महत्वाचे आहे, आणि घावण्याची ती ओळख सुद्दा आहे. घावणे बनवण्यासाठी उत्तम प्रकारच्या तांदळाची आवश्यकता असते. तरच घावणे मऊ व लुसलुशीत बनतांत.
त्याच बरोबर घावणे बनवण्यासाठी लागणारा भिडी तवा योग्य असणे आवश्यक आहे. ४० ते ५० वर्षा पूर्वी दगडाचे तवे बाजारात उपलब्ध होते, त्यावर घावणे उत्तम बनत होते परंतु आताच्या काळात लोखंडाचे भिडी तवे बाजारात मिळतात त्याचा आपण वापर करू शकतो.
महत्वपूर्ण सूचना:
तवा बाजारातून विकत आणल्यावर त्यावर कांद्याचे चकते काढून २ चमचे तेलांत शेगडीवर तापवणे आणि ते २ ते ३ दिवस तसेच ठेवणे. नंतर त्या तव्यावर घावणे बनवूं शकतो. हा प्रयोग जुन्या तव्यावर जर घावणे बरोबर येत नसतील तरीसुद्धा करू शकता. याचा उत्तम फायदा होतो व घावणे सुद्धा उत्तम बनतात.
सुरुवातीला आपण घावणे बनवण्याची पद्धत पाहूया. त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे घेऊ.
साहित्य:
- २ वाटी तांदूळ
- पाणी
- मीठ
- तेल
बनवण्याची कृती:
- प्रथम २ वाटी तांदूळ पाण्यात ७ ते ८ तास भिजत ठेवा.
- ८ तासानंतर तांदूळ स्वछ धुवून मिक्सर मधून बारीक वाटून घ्या.
- १ वाटी पाणी घालून मिश्रण तयार करून घ्या.
- तवा गरम झाला कि त्याला तेल लावून घ्या आणि मिश्रण पूर्णपसरवूनतव्यावरघाला.
- तव्यावर झाकण ठेवा.
- २ मिनिटानंतर घावन फिरवून घ्या.
- १ मिनिटानंतर तयार घावण प्लेट वर काढून घ्या.
- घावणे चटणी सोबत किंवा एखाद्या ग्रेव्ही सोबत सर्व्ह करू शकता.
- आणि या अतिशय उत्तम डिश चा आस्वाद घेऊ शकता.
कोकणातील ही अतिशय उत्तम झटपट बनणारी पारंपारीक डिश आहे, जी तुम्ही घरी बनवा व नक्की कंमेंट मध्ये लिहा.
अधिक माहितीसाठी आमच्या युट्युब चॅनेलला अवश्य भेट द्या. रेसिपी आवडल्यास कमेंट मध्ये नक्की लिहा, चॅनेलला लाइक आणि सब्सक्राइब करा : https://youtu.be/5Q5EVc3qn5U

No comments:
Post a Comment