घरच्याघरी बनवा चविष्ट सांभार
सांभार हा एक लोकप्रिय दक्षिण भारतीय पदार्थ आहे. डोसा, इडली, मेदू वडा यासोबत सांभार सर्व्ह केले जाते. सांभारचा आस्वाद केवळ दक्षिण भारतीयच नाही तर सर्व भारतीय लोकांमधे घेतला जातो.साहित्य:
- तूर डाळ
- शेवग्याच्या शेंगा
- १ कापलेला कांदा .
- १ कापलेला टोमॅटो
- १/४ वाटी कापलेला भोपळा
- ३ इंच कापलेल्या शेवग्याच्या शेंगा
- २ चमचे संभार मसाला
- १/४ वाटी कापलेलं वांगे
- १/४ वाटी चिंचेचा कोळ तेल
- मीठ
- २ चमचे लाल मिरची पूड
- ७ ते ८ कडीपत्ता पाने
- १/४ चमचा मोहरी
- २ चिमूट हिंग
- १ सुकी लाल मिरची
बनवण्याची कृती:
प्रथम तूरडाळ एका भांड्यात धुवून घ्या.
त्यात ३ वाटी पाणी घाला. आणि कुकर मधून शिजवून घ्या.
शिजलेली डाळ एका भांड्यात ओतून गॅस वर ठेवा.
आता त्यात मीठ, चिंचेचा कोळ, २ चमचे संभार मसाला आणि २ चमचे लाल मिरची पूड घाला.
डाळ ५ ते ७ मिनिट मध्यम आचेवर शिजवून घ्या.
फोडणी साठी तेल गरम करा.
तेल गरम झाले कि त्यात मोहरी, हिंग, कडीपत्ता आणि १ सुकी लाल मिरची घाला.
खमंग फोडणी देऊन १ मिनिट झाकण ठेवा.
गरमागरम सांभार तयार.
अधिक माहितीसाठी आमच्या युट्युब चॅनेलला अवश्य भेट द्या. रेसिपी आवडल्यास कमेंट मध्ये नक्की लिहा, चॅनेलला लाइक आणि सब्सक्राइब करा
: https://youtu.be/z-L52bEQl9c

No comments:
Post a Comment