मका हा एक पौष्टिक आणि स्वादिष्ट अन्नधान्य आहे. मक्याचा वापर विविध पाककृतीमध्ये केला जातो. मक्याचे दाणे सॅलड्स, सूप, सॅन्डविच आणि साइड डिशमध्ये वापरले जातात. मक्याचे कणीस वाफवून किंवा ग्रील्ड करून लोणी आणि मसाल्यासह सर्व्ह केले जाते. तसेच मक्याच्या सुकलेल्या दाण्यापासून पॉपकॉर्न आणि कॉर्नफ्लेक्स बनवतात. सकाळच्या नाश्त्यासाठी कॉर्नफ्लेक्स हे एक उत्तम पर्याय आहे.
मक्याचा वापर कॉर्नस्टार्च आणि कॉर्न सिरप सारखी उत्पादने तयार करण्यासाठी देखील केला जातो जे ग्रेव्हीपासून मिष्टान्नांपर्यंत विविध पाककृतींमध्ये घट्टपणा येण्यासाठी वापरले जाते.
मक्यामध्ये असलेले फायबर आरोग्यास फायदेशीर असते. यात बी आणि व्हिटॅमिन सी जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात.
मक्यामध्ये मॅग्नेशियम आणि फॉस्फरस या यासारखा खनिजांचे प्रमाण भरपूर असते, जे शरिरासाठी खुप आवश्यक असते.
आता आपण मक्याची भाजी बनवण्याची पद्धत पाहूया. त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे घेऊ.
साहित्य:
- १ वाटी मक्याचे दाणे
- १ वाटी ओलं खोबरं
- 2 कांदे कापलेले
- वाटलेली आलं लसूण
- कोथिंबीर
- तेल
- अर्धा चमचा जिरं
- २ चमचे मसाला
- अर्धा चमचा धने जिरे पूड
- १ चमचा मीठ
प्रथम कढई मध्ये १ चमचा तेल घाला.
त्यात कांदा लालर्सर होईपर्यंत तळून घ्या.
आता त्यात ओलं खोबर घालून २ मिनिट परतून घ्या आणि गॅस बंद करा.
मिश्रण थंड झाल्यावर २ चमचे मसाला आणि अर्धा चमचा धने जिरे पूड घालून वाटण तयार करा.
मक्याचे दाणे मिक्सर मधून जाडसर भरडून घ्या.
जिरं लालसर झालं कि कडीपत्ता आणि आलं लसूण पेस्ट घाला.
१ मिनिटानंतर त्यात बारीक कापलेला टोमॅटो आणि मीठ घालून अर्धा मिनिट शिजू द्या.
आता भरडलेले मक्याचे दाणे आणि खोबऱयाचे वाटण घाला.
२ वाटी पाणी घालून मिश्रण १५ ते २० मिनिट शिजवून घ्या.
आता चिरलेली कोथींबीर घालून गॅस बंद करा.
अधिक तपशीलांसाठी: https://youtu.be/CffOCCutyAw

No comments:
Post a Comment