आता आपण कांदा भजी बनवण्याची पद्धत पाहूया. त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे घेऊ.
साहित्य:
- १ वाटी उभा पातळ चिरलेला कांदा
- ७ ते ८ हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या
- अर्धा इंच आलं बारीक कापलेलं
- १/४ वाटी बारीक कापलेली कोथिंबीर
- १/४ चमचा ओवा
- अर्धा चमचा जिरं
- मीठ
- १ वाटी बेसन
- तेल
- २ लहान चमचे तांदळाचे पीठ
बनवण्याची कृती:
प्रथम एका भांड्यात कापलेला कांदा, कापलेली हिरवी मिरची, आलं, कोथिंबीर घ्या.
त्यात जिरं आणि ओवा घाला आता त्यात १ वाटी बेसन आणि २ लहान चमचे तांदळाचे पीठ, चवीनुसार मीठ घाला आणि अर्धी वाटी पाणी घालून मिश्रण तयार करा.
कढई मध्ये तेल गरम करून भजी लालसर होईपर्यंत तळून घ्या.
कुरकुरीत कांदा भजी तयार.
अधिक माहितीसाठी आमच्या युट्युब चॅनेलला अवश्य भेट द्या. रेसिपी आवडल्यास कमेंट मध्ये नक्की लिहा, चॅनेलला लाइक आणि सब्सक्राइब करा.
: https://youtu.be/4xIRtGkPERk

No comments:
Post a Comment