Wednesday, 5 April 2023

गोड शिरा तयार करण्याची सोपी रेसिपी

गोड शिरा तयार करण्याची सोपी रेसिपी


गोड शिरा
 
गोड शिरा, हा एक पारंपारिक भारतीय गोड पदार्थ आहेशिरा हा सत्यनारायणाच्या महापूजेला प्रसाद म्हणून बनवला जातोगोड शिरा हा रव्यापासून बनवला जातोशिरा बनवण्यासाठी तुपात भाजलेल्या रव्यामध्ये दूध, साखर आणि ड्रायफ्रूट्स घालून शिजवला जातोअसा पौष्टिक आणि रुचकर गोड शिरा बनवण्याची पद्धत पाहूया.  त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे घेऊ.

साहित्य:

  • दीड  वाटी रवा
  •  वाटी साखर 
  •  वाटी दूध 
  •  चमचे तूप 
  •   लवंग 
  •   चमचा वेलची पूड 
  •   ते १० काजूगर 
  •   वाटी पाणी 
बनवण्याची कृती:
सर्वात आधी  कढईमधे ३ चमचे तूप घ्या.तुपाचा खमंग वास आल्यावर त्यात २ लवंग घाला. 

आता रवा घाला. 

१० ते १२ मिनिट रवा तुपामध्ये मंद ते मध्यम आचेवर भाजून  घ्या. 

रवा सोनेरी लालसर झाल्यावर त्यात १ वाटी साखर घाला.  

रवा आणि साखर नीट  मिसळून त्यात १ वाटी दूध घाला.  

आता त्यात २ वाटी पाणी घाला.  मंद आचेवर झाकण ठेवून ३ ते ४ मिनिट शिजवून घ्या. 
 
वेलची पूड आणि काजूपूड घालून गॅस बंद करा.  

गरमागरम गोड  शिरा तयार !

अधिक माहितीसाठी आमच्या युट्युब चॅनेलला अवश्य भेट द्या.  रेसिपी आवडल्यास कमेंट मध्ये नक्की लिहाचॅनेलला लाइक आणि सब्सक्राइब करा : https://youtu.be/XObDN50NbyE

No comments:

Post a Comment

घरच्या घरी बनवा मुंबईचा फेमस वडा पाव

घरच्या घरी बनवा मुंबईचा फेमस वडा पाव       मुंबईतील काही प्रसिद्ध वडा पाव सेन्टर आहेत जे तुम्ही गूगल वर शोधू शकता .   आता आपण ...