कोकणातील पारंपरिक सात काप्याचे घावणे
सात काप्याचे घावणे हा तळकोंकणातली गोड पदार्थांच्या यादीतील एक महत्त्वाचा पदार्थ. याची बनवण्याची पद्धत खुपच वेगळी आहे. हा पदार्थ खास सणांना नेवेद्य म्हणून आणि विशेष कार्यक्रमांना बनवला जातो.
सुरुवातीला आपण सात काप्याचे घावणे बनवण्याची पद्धत पाहूया. त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे घेऊ.
साहित्य:
- २ वाटी तांदूळ
- १ वाटी किसलेलं ओलं खोबर
- १ वाटी गूळ
- १/२ चमचा वेलची पूड
- पाणी
- मीठ
- तेल
बनवण्याची कृती:
- प्रथम २ वाटी तांदूळ पाण्यात ७ ते ८ तास भिजत ठेवा.
- ८ तासानंतर तांदूळ स्वछ धुवून मिक्सर मधून बारीक वाटून घ्या.
- १ वाटी पाणी घालून मिश्रण तयार करून घ्या.
- सारणासाठी एका भांड्यात ओलं खोबर, गूळ आणि वेलची पूड नीट मिसळून घ्या.
- आता तवा गरम करायला ठेवा.
- तवा गरम झाला कि त्याला तेल लावून घ्या आणि मिश्रण पूर्ण पसरवून तव्यावर घाला.
- तव्यावर झाकण ठेवा.
- २ मिनिटानंतर घावन फिरवून घ्या.
- आता अर्ध्या भागावर गूळ-खोबऱ्याचं मिश्रण घाला आणि मधून दुमडून घ्या.
- आता तव्याच्या अर्ध्या भागावर तेल लावा आणि मिश्रण घालून घ्या.
- गूळ-खोबऱ्याचं सारण घालून १ मिनिटं झाकण ठेवून शिजवून घ्या.
- अर्धा भाग सारण घातलेल्या भागावर दुमडून घ्या.
- अश्या प्रकारे ५ ते ७ वेळा करा. तयार घावण प्लेट वर काढून घ्या.
अधिक माहितीसाठी आमच्या युट्युब चॅनेलला अवश्य भेट द्या. रेसिपी आवडल्यास कमेंट मध्ये नक्की लिहा, चॅनेलला लाइक आणि सब्सक्राइब करा: https://youtu.be/n8ZeRX_Bfjs




No comments:
Post a Comment