महाराष्ट्रीयन पदार्थ एक ओळख पुरणपोळी
पुरणपोळी हा खासकरून होळी आणि गणेश चतुर्थी यांसारख्या सणांना बनवला जाणारा एक लोकप्रिय महाराष्ट्रीयन पदार्थ आहे. त्याला तेलपोळी असेही म्हणतात. यात प्रामुख्याने चणा डाळ (हरभरा डाळ) आणि गूळ घालून बनवलेल्या सारणाचे पुरण(मिश्रण) असते.
सुरुवातीला आपण पुरणपोळी बनवण्याची पद्धत पाहूया. त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे घेऊ.
साहित्य:
- १ वाटी गव्हाचं पीठ
- १/४ वाटी तांदळाचं पीठ
- १ वाटी ७ ते ८ तास भिजलेली चणा डाळ
- १ वाटी किसलेलं गूळ
- दीड वाटी पाणी
- १ छोटा चमचा वेलची पूड
- तूप
- मीठ
बनवण्याची कृती:
- प्रथम भिजलेली चणा डाळ स्वछ धुवून घ्या. आणि मीठ व पाणी घालून कुकर मधून शिजवून घ्या.
- शिजवलेली डाळ कढई मध्ये काढून घ्या.
- त्यात किसलेलं गूळ घालून गॅस वर ठेवा.
- मिश्रण ५ ते ६ मिनिटं ढवळत रहा.
- आता वेलची पूड घालून गॅस बंद करा.
- थंड झाल्यावर मिक्सर मधून वाटून घ्या.
- वाटलेलं मिश्रण पुन्हा कढईमधे ओतून घ्या आणि गॅस वर ठेवा.
- पुरण घट्ट होईपर्यंत ढवळत राहा.
- साधारण १० ते १५ मिनिटानंतर गॅस बंद करा.
- तयार पुरण थंड होऊ द्या.
- आता एक परातीमध्ये १ वाटी गव्हाचं पीठ घ्या.
- त्यात २ चमचे तूप, १/४ चमचा हळद पूड आणि १/२ चमचा मीठ मिसळून घ्या.
- थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्या. मळलेल्या पीठाला 1 चमचा तेल लावून घ्या. आणि पीठ १० मिनिट झाकून ठेवा.
- आता पिठाचा छोटा गोळा घ्या आणि त्याची खोलगट वाटी तयार करा. त्यात पिठाच्या आकाराएवढे पुरण घालून गोल आकार द्या.
- पोळपाटाला सुती कपडा बांधून घ्या यामुळे पोळी चिटकत नाही.
- पोळपाटाला थोडं तांदळाचं पीठ लावा. आणि पोळी पोळपाट वर लाटून घ्या.
- लाटलेली पोळी तव्यावर टाका आणि वरून तूप लावून घ्या.
- अर्ध्या मिनिटानंतर पोळी फिरवून घ्या.
- मध्यम आचेवर पोळी १ ते २ मिनिट शेकून घ्या.
- पोळी पूर्ण शेकल्यावर फिरवून घ्या.
- आता गॅस मोठा ठेवून पोळीला हलकं दाबून छान फुगवून घ्या. वरून तूप लावा. पुरणपोळी तयार.
अधिक माहितीसाठी आमच्या युट्युब चॅनेलला अवश्य भेट द्या. रेसिपी आवडल्यास कमेंट मध्ये नक्की लिहा, चॅनेलला लाइक आणि सब्सक्राइब करा: https://youtu.be/S-MBI2T1jQo
No comments:
Post a Comment