घरच्याघरी चुलीवर बनवलेली गोड बिस्किटे
चुलीवर बनवलेली बिस्किटे तुमच्या धार्मिक कार्यात सणांना, पार्ट्या मध्ये बनवू शकता, दिवाळी सारख्या मोठ्या सणांना फ़राळात याचा समावेश करू शकता. इतर फराळा पेक्षा बिस्किटे जास्त काळ टिकतात व बनवण्यास ही सोपे आहेत.
सुरुवातीला आपण बिस्किटे बनवण्याची पद्धत पाहूया. त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे घेऊ.
साहित्य:
- ३ वाटी गव्हाचं पीठ
- १ वाटी रवा
- २ वाटी साखर
- अडीच वाटी तूप
- १ चमचा वेलची पूड
- ८ ते १० काजूगर
बनवण्याची कृती:
- प्रथम २ वाटी साखर आणि वेलची मिक्सर मधून बारीक वाटून घ्या.
- एका परातीमध्ये गव्हाचं पीठ, रवा साखर आणि वेलची पूड नीट मिसळून घ्या.
- आता त्यात तूप घालून पीठ मळून घ्या.
- ५ मिनिट पीठ मऊ होईपर्यंत मळत रहा.
- आता थोडं पीठ घेऊन त्याला आवडीनुसार आकार द्या. आणि अर्धा इंच जाडीचे काप करून घ्या. आता चाळणीला आतून थोडंसं तूप लावा.
- काप चाळणीमध्ये नीट ठेवा. त्यावर काजूगर लावून घ्या.
- एक मोठा टोप घेऊन त्यात रेती घाला. आणि टोप चुलीवर गरम करायला ठेवा.
- रेती गरम झाल्यावर चाळणी ठेवून वरून झाकण ठेवा. १५ मिनिटे बिस्किटे भाजून घ्या.
चुलीवर बनवलेली बिस्किटे तयार.
अधिक माहितीसाठी आमच्या युट्युब चॅनेलला अवश्य भेट द्या. रेसिपी आवडल्यास कमेंट मध्ये नक्की लिहा, चॅनेलला लाइक आणि सब्सक्राइब करा : https://youtu.be/wFNtXrCOdok


No comments:
Post a Comment