गायीच्या चिकापासून बनवा मऊ जाळीदार खरवस
खरवस, हा एक पारंपारिक भारतीय गोड पदार्थ आहे, विशेषत: पश्चिम भारतातील महाराष्ट्र राज्यात लोकप्रिय आहे. हा कोलोस्ट्रम दुधापासून किंवा चीक पासून बनविलेला एक स्वादिष्ट पदार्थ आहे. जो गायी किंवा म्हशींनी वासरांना जन्म दिल्यानंतर पहिल्या काही दिवसांत तयार होणाऱ्या दुधापासून बनवला जातो.
सुरुवातीला आपण जाळीदार खरवस बनवण्याची पद्धत पाहूया. त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे घेऊ.
साहित्य:
- १ लिटर गाईचा चीक
- १ किलो किसलेलं गूळ
- १/२ चमचा जिरे
- १ चमचा वेलची पूड
- १ चमचा हळद पूड
- १ वाटी ओलं खोबर
- प्रथम मिक्सर जार मध्ये ओलं खोबर वेलची पूड,जिरे,आणि हळद घाला, आणि १/४ वाटी पाणी घालून मिक्सर मधून वाटून घ्या.
- वाटलेलं मिश्रण चाळणीतून गाळून घ्या.
- आता गाळलेल्या मिश्रणामध्ये किसलेलं गूळ घालून पूर्ण विरघळेपर्यंत ढवळत राहा.
- गूळ पूर्ण विरघळल्यानंतर त्यात चीक घालून नीट ढवळून घ्या.
- आता तयार मिश्रण एक टोपामध्ये मध्ये किंवा डब्यामध्ये ओतून त्याला वरून केळीचं पान बांधून घ्या.
- केळीच्या पानाला २ ते ३ छोटे छिद्र पाडून घ्या.
- टोप कुकरमध्ये ठेवा आणि ८ ते १० शिट्या करा किंवा शिटी न लावता अर्धा तास शिजवून घ्या.
- कुकर थंड झाल्यावर वड्या कापून घ्या. खरवस तयार.
अधिक माहितीसाठी आमच्या युट्युब चॅनेलला अवश्य भेट द्या. रेसिपी आवडल्यास कमेंट मध्ये नक्की लिहा, चॅनेलला लाइक आणि सब्सक्राइब करा:https://youtu.be/fWgZF6-gg1c


No comments:
Post a Comment