झटपट बनणारी नीर फणसाची काप
नीर फणस हा विशेषतः कोकणी, दक्षिण भारतीय भाषेतील एक शब्द आहे.
सुरुवातीला आपण नीर फणसाची काप बनवण्याची पद्धत पाहूया. त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे घेऊ.
साहित्य:
- १ नीरफणस
- १ चमचा लाल तिखट
- १/२ चमचा धने जिरे पूड
- १ चमचा मीठ
- तेल
- १ वाटी तांदळाचं पीठ
- २ चमचे रवा
- पाणी
बनवण्याची कृती:
- प्रथम दोन्ही हाताला तेल लावून घ्या.
- नीरफणसाचे काटेरी आवरण काढून घ्या.
- आणि मधोमध उभा कापून घ्या.
- कापलेल्या फणसाचे १/४ इंच जाडीचे काप करून घ्या.
- १० मिनिट पाण्यात ठेऊन द्या.
- फणसाची काप ताटात काढून त्यांना १ चमचा लाल तिखट, धने जिरे पूड, मीठ आणि हळद पूड लावून घ्या.
- १० ते १५ मिनिट झाकून ठेवून द्या.
- १० मिनिटानंतर तवा गरम करून त्यावर २ चमचे तेल घाला.
- तांदळाच्या पिठामध्ये रवा,मीठ,आणि लाल मिरची पूड घालून नीट मिसळून घ्या.
- फणसाच्या कापांवर तांदळाचं पीठ लावून तव्यावर ठेवा.
- २ ते ३ मिनिटानंतर फिरवून घ्या.
- आणि दुसऱ्या बाजूने लालसर सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. चविष्ट नीरफणसाची काप तयार.
अधिक माहितीसाठी आमच्या युट्युब चॅनेलला अवश्य भेट द्या. रेसिपी आवडल्यास कमेंट मध्ये नक्की लिहा, चॅनेलला लाइक आणि सब्सक्राइब करा: https://youtu.be/zQJexRcCeAk



No comments:
Post a Comment