उडीद डाळीपासून बनवता येणारा झटपट खुसखुशीत मेदू वडा
मेदू वडा हा एक लोकप्रिय दक्षिण भारतीय पदार्थ आहे. मेदू वडा हा उडीद डाळीच्या पिठापासून
बनवतात. मेदू वडा बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असतो.
दक्षिण भारतातील हि एक अतिशय आवडती
मेदू वडा हा नारळाची चटणी, सांबार बरोबर सर्व्ह केला जातॊ.
सुरुवातीला आपण खुसखुशीत मेदू वडा बनवण्याची पद्धत पाहूया. त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे घेऊ.
साहित्य:
- १/४ किलो उडीद डाळ
- ७ ते ८ काळी मिरी पावडर
- २ कापलेले कांदे
- ६ ते ७ बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या
- मीठ
- १/४ चमचा खाण्याचा सोडा
- तेल
- १/४ कप कोथिंबीर
- ७ ते ८ कडीपत्ता पाने
बनवण्याची कृती:
- प्रथम उडीद डाळ २ तास पाण्यात भिजत ठेवा.
- भिजलेली डाळ अगदी थोडं पाणी वापरून मिक्सर मधून वाटून घ्या.
- वाटलेली डाळ एका भांड्यात काढून घ्या आणि २ ते ३ मिनिट फेटून घ्या.
- आता मिश्रणामध्ये कापलेला कांदा, बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या, काळी मिरी पावडर, मीठ आणि कोथिंबीर घालून नीट मिसळून घ्या.
- गॅस वर कढई ठेवून तेल तापवून घ्या.
- आता लांब दांड्याचा चमचा घेऊन त्याला बोटांनी पाणी लावून घ्या.
- त्यावर पिठाचं मिश्रण ठेऊन गोल आकार द्या.
- मधोमध पाणी लावलेल्या बोटाने मधोमध एक भोक पाडून घ्या.
- आणि काळजीपूर्वक तेलात सोडा.
- मध्यम ते मोठ्या गॅस वर वडे लालसर होईपर्यंत तळून घ्या.
महत्वपूर्ण सूचना:
वडा तेलात सोडताना कमी अंतरावरून काळजीपूर्वक सोडा.
अधिक माहितीसाठी आमच्या युट्युब चॅनेलला अवश्य भेट द्या.
रेसिपी आवडल्यास कमेंट मध्ये नक्की लिहा, चॅनेलला लाइक आणि सब्सक्राइब करा :
https://youtu.be/cXF7jKvyp3U


No comments:
Post a Comment