तांदळाच्या पिठाचा कुरकुरीत शेव
'तांदळाच्या पिठाचा कुरकुरीत शेव' हा संपूर्ण भारतातील लोकप्रिय पदार्थ आहे.
सुरुवातीला आपण तांदळाच्या पिठाचा कुरकुरीत शेव बनवण्याची पद्धत पाहूया. त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे घेऊ.
साहित्य:
- ४ वाट्या तांदळाचं पीठ
- दीड वाटी बेसन
- अर्धा चमचा जिरे
- २ चमचे लाल मिरची पूड
- २ चमचे तूप
- दीड लिटर पाणी
बनवण्याची कृती:
- प्रथम एका टोपामध्ये दीड लिटर पाणी गरम करायला ठेवा.
- पाणी उखळले कि अर्ध पाणी बाजूला ठेवा.
- आता उरलेल्या पाण्यात २ चमचे तूप घाला.
- तूप विरघळले कि त्याला जिरे, लाल तिखट, मीठ आणि हळद पावडर घालून एक उकळी येऊ द्या. कोरडं तांदळाचं पीठ आणि बेसन नीट मिसळून घ्या.
- आता पीठ गरम पाण्यात घालून नीट ढवळून घ्या.
- आणि १० ते १५ मिनिट झाकण ठेऊन द्या.
- १५ मिनिटानंतर पीठ थोडं थोडं गरम पाणी घालून नीट मळून घ्या.
- आता शेवाच्या साच्याला आतून थोडं पाणी लावून घ्या आणि त्यात पीठ भरून घ्या.
- गॅस वर कढई ठेवून तेल तापवून घ्या.
- तेल गरम झाल्यावर कढई मध्ये शेव पाडून घ्या.
- लालसर होईपर्यंत तळून घ्या. कुरकुरीत शेव तयार.
अधिक माहितीसाठी आमच्या युट्युब चॅनेलला अवश्य भेट द्या. रेसिपी आवडल्यास कमेंट मध्ये नक्की लिहा, चॅनेलला लाइक आणि सब्सक्राइब करा: https://youtu.be/N4GQkxLd0ZY

No comments:
Post a Comment