घरच्याघरी बनवा झटपट होणारे कुरमुऱ्याचे लाडू

कुरमुऱ्याचे लाडू प्रवासात खाण्यासाठी योग्य पर्याय आहेत. वजनाने हलके असल्यामुळे प्रवासात नेण्यास चांगले आहते.
साहित्य:
- १ किलो कुरमुरे
- १/२ किलो गूळ
- १ वाटी पाणी
- प्रथम कढई मध्ये कुरमुरे ४ ते ५ मिनिट गरम करून घ्या.
- आणि मोठ्या ताटा मध्ये काढून घ्या.
- आता गुळा मध्ये १/२ वाटी पाणी घालून पाक तयार करा.
- पाक थोडा घट्ट झाल्यावर कुरमुरे घालून नीट मिसळून घ्या.
- हाताला थोडं पाणी लावून घ्या.
- मिश्रण गरम असताना हाताने दाबून घ्या, आणि गोल आकार द्या. कुरमुरे लाडू तयार.
अधिक माहितीसाठी आमच्या युट्युब चॅनेलला अवश्य भेट द्या.
रेसिपी आवडल्यास कमेंट मध्ये नक्की लिहा, चॅनेलला लाइक आणि सब्सक्राइब करा: https://youtu.be/gEYS7H9cu68

No comments:
Post a Comment