१० मिनिटात बनवा झणझणीत कोळंबी मसाला
कोळंबी हे लोकप्रिय सीफूड आहे, त्यापासून विविध स्वादिष्ट पाककृती बनवले जातात.
आता आपण झणझणीत कोळंबी मसाला बनवण्याची पद्धत पाहूया. त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे घेऊ.
साहित्य:
- १ वाटी साफ केलेली कोळंबी
- १ चमचा आलं लसूण पेस्ट
- १ चमचा कोथिंबीर आणि हिरवी मिरची पेस्ट
- ३ कापलेले कांदे
- २ कापलेले टोमॅटो
- मीठ
- तेल
- ६ ते ७ कडीपत्ता पाने
- १/४ वाटी कोथिंबीर
- १ चमचा लाल मिरची पूड
- १/२ चमचा धने-जिरे पूड
बनवण्याची कृती:
- प्रथम एक कढई मध्ये दीड चमचा तेल गरम करा.
- तेल गरम झालं कि त्यात कडीपत्ता आणि कापलेला कांदा घाला.
- कांदा थोडा गुलाबी झाल्यावर आलं लसूण पेस्ट घाला.
- अर्ध्या मिनिटानंतर टोमॅटो घाला.
- कोथिंबीर पेस्ट घालून नीट मिसळून घ्या.
- मीठ, लाल तिखट आणि धने जिरे पूड घाला.
- नीट मिसळून घ्या आणि १ मिनिट शिजू द्या.
- आता कोळंबी घाला आणि नीट मिसळून घ्या.
- १/२ वाटी पाणी घालून झाकण ठेवा.
- १० मिनिट शिजू द्या. झणझणीत कोळंबी मसाला तयार.
अधिक माहितीसाठी आमच्या युट्युब चॅनेलला अवश्य भेट द्या. रेसिपी आवडल्यास कमेंट मध्ये नक्की लिहा, चॅनेलला लाइक आणि सब्सक्राइब करा : https://youtu.be/blaIbWfTi8M


No comments:
Post a Comment