वेगळ्या प्रकारे बनवा ब्रेड चीज कटलेट
ब्रेड चीज कटलेट हे टेस्टी आणि आवडते स्ट्रीट फूड आहे. हे पुदिना चटणी आणि सॉस सॊबत सर्व्ह केले जाते. ब्रेड चीज कटलेट विविध प्रकारे बनवले जाते. ब्रेड चीज कटलेटला तुमच्या आवडीनुसार आकार देऊ शकता.
ब्रेड चीज कटलेटमध्ये विशेषतः उकडलेले बटाटे, चीज, सिमला मिरची, गाजर यांचा समावेश असतो.
आता आपण ब्रेड चीज कटलेट बनवण्याची पद्धत पाहूया. त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे घेऊ.
साहित्य:
- ब्रेड स्लाइस
- २ उकडलेले बटाटे
- १ सिमला मिरची बारीक चिरलेली
- ७ ते ८ ठेचलेल्या लसूण पाकळ्या
- १ वाटी बेसन
- चीज
- मीठ
- हळद
- १/२ चमचा धने जिरे पूड
- तेल
बनवण्याची कृती:
- एका भांड्यात उकडलेले बटाटे कुस्करून घ्या.
- त्यात कापलेला कांदा, चिरलेली सिमला मिरची,ठेचलेली लसूण, मीठ, हळद पूड, धने जिरे पूड घालून सर्व साहित्य नीट मिसळून घ्या.
- ब्रेड स्लाइस गोलाकार आकारामध्ये कापून घ्या.
- बटाट्याच्या मिश्रणामध्ये चीज भरून घ्या आणि तळव्यावर हलका दाबून गोळे बनवून घ्या.
- एक ब्रेड स्लाइस घेऊन बटाट्याचा गोळा ठेवा.
- त्यावर दुसरा ब्रेड स्लाइस ठेवा आणि हलका दाबून घ्या.
- आता एक भांड्यामधे बेसन घेऊन त्यात मीठ आणि हळद घाला, आणि पाणी घालून जाडसर मिश्रण तयार करा.
- ब्रेड कटलेट बेसन मिश्रणमध्ये पूर्ण बुडवून कढईत सोडा.
- कटलेट हलकं तपकिरी होईपर्यंत तळून घ्या. ब्रेड चीज कटलेट तयार.
अधिक माहितीसाठी आमच्या युट्युब चॅनेलला अवश्य भेट द्या. रेसिपी आवडल्यास कमेंट मध्ये नक्की लिहा, चॅनेलला लाइक आणि सब्सक्राइब करा: https://youtu.be/cgHRYlfkwVo


No comments:
Post a Comment