असा बनवा मसालेदार कुरकुरीत बांगडा फ्राय
बांगडा मासा हा लोकप्रिय सीफूडपैकी एक आहे. बांगडा मासा हा त्याची चव आणि परवडणारा दर यामुळे मांसाहारी लोकांमध्ये जास्त आवडता आहे. बांगडा माश्यापासून आपण बांगडा कढी आणि बांगडा फ्राय अश्या चटकदार डिश बनवू शकतो.
आता आपण कुरकुरीत बांगडा फ्राय बनवण्याची पद्धत पाहूया. त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे घेऊ.
साहित्य:
- ५ ते ६ बांगडा फिश
- रवा
- लाल मिरची पूड
- आलं -लसूण पेस्ट
- कोकम रस
बनवण्याची कृती:
- प्रथम मासे कापून घ्या.
- कापलेले मासे थोडा वेळ मीठ लावून ठेवा.
- १० मिनिटानंतर मासे पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या.
- नंतर मासे आलं,लसूण पेस्ट, लाल मिरची पूड आणि कोकम रस किंवा लिंबू रस लावून २० ते ३० मिनटं ठेवा. २० मिनिटा नंतर.
- कढई मध्ये तेल गरम करायला ठेवा.
- तेल गरम झाल्यावर मासे रवा किंवा तांदळाचे पीठ लावून कढईत सोडा .
- मासे लालसर होई पर्यंत तळून घ्या.
- बांगडा फ्राय
तुम्ही भात-मच्छीकढी या बरोबर खाऊ शकता.
अधिक माहितीसाठी आमच्या युट्युब चॅनेलला अवश्य भेट द्या. रेसिपी आवडल्यास कमेंट मध्ये नक्की लिहा, चॅनेलला लाइक आणि सब्सक्राइब करा: https://youtu.be/ncnCZwgrSB8



No comments:
Post a Comment