कुरकुरीत झटपट मका भजी बनवण्याची सर्वात सोप्पी पद्धत
मका भजी म्हणजेच कॉर्न पकोडा हा एक लोकप्रिय भारतीय नाश्ता आहे जो ताज्या, गोड मक्याच्या दाण्यांपासून तयार केला जातो आणि त्यात बेसन (बेसन) पिठ मिसळून कुरकुरीत होईपर्यंत तळले जाते. हा एक स्वादिष्ट आणि कुरकुरीत नाश्ता आहे जो सामान्यतः पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात केला जातो.
कॉर्न पकोडे पुदिनाची चटणी किंवा दह्या सोबतही खाऊ शकता.
आता आपण कॉर्न पकोडे बनवण्याची कृती पाहू !
साहित्य:
- २ ताजे मक्याचे कणीस
- २ चमचे कॉर्न फ्लोअर
- ४ ते ५ चमचे बेसन
- १ चमचा आलं-लसूण पेस्ट
- १ चमचा लाल मिरची पूड
- १/२ चमचा धने जिरे पूड
- १/४ कप चिरलेली कोथिंबीर
- मीठ
- तेल
बनवण्याची कृती:
- सुरुवातीला मक्याचे दाणे काढून घ्या आणि मिक्सर मधून जाडसर वाटून घ्या.
- मिश्रण एका बाऊल मध्ये काढून त्यात २ चमचे कॉर्न फ्लोअर, ४ ते ५ चमचे बेसन, १ चमचा मीठ, १ चमचा लाल मिरची पूड , १/२ चमचा धने-जिरे पूड, १ चमचा आलं-लसूण पेस्ट आणि १/४ कप चिरलेली कोथिंबीर घालून नीट मिसळून घ्या.
- आता कढई मध्ये तेल गरम करून घ्या.
- तेल गरम झाल्यावर भजी मध्यम आचेवर लालसर होईपर्यंत तळून घ्या.
- गरमागरम कुरकुरीत मक्याची भजी तयार.



No comments:
Post a Comment