आंबा मलाई बर्फी # झटपट आणि सोपी आंब्याची मिठाई
आंबा मलाई बर्फी किंवा आंब्याची मिठाई बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहे त्यातली एक सोपी व योग्य पद्धत आपण पाहू !
साहित्य:
- ४ ते ५ हापूस आंबे
- २ वाटी दूध
- २ वाटी साखर
- १ चमचा कॉर्नफ्लोअर
- १/२ चमचा सायट्रिक ऍसिड
बनवण्याची कृती:
- सुरुवातीला पिकलेले रसाळ चांगल्या प्रतीचे हापूस आंबे स्वच्छ धुऊन कापून रस काढून घ्या.
- रसाच्या समप्रमाणात साखर घ्या. एका पॅन मध्ये २ कप दूध गरम करायला ठेवा.
- एका बाउल मध्ये १ चमचा कॉर्न फ्लोअर पाण्यात मिसळून घ्या.
- दुसऱ्या बाउल मध्ये १/२ चमचा सायट्रिक ऍसिड पाण्यात मिसळून घ्या.
- दूध आटून अर्ध झाल्यावर, पाण्यात मिसळलेलं सायट्रिक ऍसिड आणि कॉर्न फ्लोअर दुधात घाला.
- २ मिनिटानंतर आंब्याचा रस घाला.
- आता रसाच्या समप्रमाणात घेतलेली साखर दुधात घालून मिश्रण मंद आचेवर सतत ढवळत रहा.
- मिश्रण थोडं घट्ट झाल्यावर गॅस बंद करा.
- बर्फी चे मिश्रण तूप लावलेल्या प्लेट मध्ये ओतून घ्या आणि नीट पसरवुन घ्या.
वरून ड्रायफ्रूट पावडर घाला.
- २ ते ३ तासानंतर बर्फी च्या वड्या कापून घ्या.
अशा प्रकारे घरी बनवलेली अत्यंत शुद्ध आंब्याची मिठाई तुम्ही तुमचा घरी लहान मुलांना खाण्यासाठी देऊ शकता, किंवा तुमच्या नातेवाईक, मित्र मंडळींना भेट देऊ शकता.
तुमच्या धार्मिक कार्यात सणांना, पार्ट्या मध्ये बनवू शकता, दिवाळी सारख्या मोठ्या सणांना फ़राळात याचा समावेश करू शकता.
अधिक माहितीसाठी आमच्या युट्युब चॅनेलला अवश्य भेट द्या. रेसिपी आवडल्यास कमेंट मध्ये नक्की लिहा, चॅनेलला लाइक आणि सब्सक्राइब करा: https://youtu.be/bUebXBKd4Q4?si=Cb0a41XI8Aogv80I




No comments:
Post a Comment