गव्हाच्या पिठाच्या कूकीज
गव्हाच्या पीठामध्ये कार्बोहायड्रेट्स, फायबर, प्रथिने, जीवनसत्त्वे जास्त प्रमाणात असतात. मैद्या पेक्षा गव्हाच्या पीठामध्ये जास्त पोषक घटक असतात.
गव्हाचे पीठ हे ब्रेड, पास्ता, पेस्ट्री, केक, कुकीज यासारख्या पाककृतींमध्ये वापरले जाते.
गव्हाच्या पिठाच्या कूकीज बनवण्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे घेऊ.
साहित्य:
• दीड वाटी गव्हाचं पीठ
• दीड वाटी रवा
• दीड वाटी पिठी साखर
• १ वाटी तूप
• १/२ वाटी टुटूफ्रूटी
• १ चमचा वॅनिला इसेन्स
बनवण्याची कृती:
- प्रथम एका भांड्यात दीड वाटी गव्हाचं पीठ, दीड वाटी रवा, आणि दीड वाटी पिठी साखर नीट मिसळून घ्या.
- त्यात १ वाटी तूप घालून घ्या.
- त्या नंतर १ चमचा वॅनिला इसेन्स घाला, आणि पीठ मळून घ्या.
- १० ते १५ मिनिट पीठ मऊ होईपर्यंत मळून घ्या.
- आता लिंबाच्या आकाराचे गोळे बनवून त्याला तळहातावर हलके दाबून कुकीजचा आकार द्या.
- तयार कुकीजला वरून टूटीफ्रूटी लावा.
- हे सर्व कुकीजओव्हन ट्रे मध्ये काढून घ्या
- ओव्हनला प्रिहिट करून घ्या.
- ओव्हन प्रिहिट झाल्यावर, कॉनवेकशन मोड मध्ये 170 °C सेट करून घ्या.
- कुकीज ट्रे ओव्हन मध्ये काळजीपूर्वक ठेवा व १८ मिनिट बेक करा.
- बेक झाल्या वर ट्रे थंड होई पर्यंत थांबा, थंड झाल्यावर कुकीज प्लेट मध्ये काढून घ्या.
अशा प्रकारे घरच्या घरी बनवलेले कुकीज तुम्ही तुमच्या लहान मुलांना खाण्या साठी देऊ शकतात, सकाळच्या नाश्त्या मध्ये किंवा प्रवास करताना सोबत ठेऊ शकता.
तुमच्या धार्मिक कार्यात सणांना, पार्ट्या मध्ये बनवू शकता, दिवाळी सारख्या मोठ्या सणांना फ़राळात याचा समावेश करू शकता. इतर फराळा पेक्षा कुकीज जास्त काळ टिकतात. बनवण्यास सोपे आहेत व बनवण्यसाठी वेळ ही कमी लागतो.
अधिक माहितीसाठी आमच्या युट्युब चॅनेलला अवश्य भेट द्या. रेसिपी आवडल्यास कमेंट मध्ये नक्की लिहा, चॅनेलला लाइक आणि सब्सक्राइब करा: https://youtu.be/Vw4XiWyR6Ng?si=hzoLmz06GGp7sQP6




No comments:
Post a Comment