सोप्या प्रकारे बनवा मऊ गोड बुंदी

बुंदी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे घेऊ.
साहित्य:
- १ वाटी बेसन
- १ वाटी पाणी
- १ वाटी साखर
- १/२ चमचा वेलची पूड
- १ चमचा तूप
- १/४ चमचा पिवळा फूड कलर
- तळण्यासाठी तेल किंवा तूप
- प्रथम एका बाउल मध्ये बेसन घ्या.
- त्यात पाणी घालून घ्या.
- मिश्रण ५ ते ७ मिनिटं नीट फेटून घ्या जेणेकरून गुठळी राहणार नाही.
- फूड कलर घाला आणि नीट मिसळून घ्या.
- तेल गरम झाल्यावर झाऱ्याच्या साहाय्याने बुंदी पाडून घ्या.
- साखरेचा पाक करण्यासाठी साखर आणि पाणी घालून विरघळून घ्या.
- १० मिनिट पाक सतत ढवळत राहा.
- एकतारी पाक तयार झाल्यावर त्यात वेलची पूड घाला.
- १ चमचा तूप घालून अर्धा तास झाकून ठेवा.
- आता बुंदी घालून ५ मिनिट मंद आचेवर ठेवा.
- साखरेचा पाक बुंदी मध्ये पूर्ण शोषल्यानंतर प्लेट मध्ये काढुन घ्या.
- गोड बुंदी तयार.
अधिक माहितीसाठी आमच्या युट्युब चॅनेलला अवश्य भेट द्या. रेसिपी आवडल्यास कमेंट मध्ये नक्की लिहा ,चॅनेलला लाइक आणि सब्सक्राइब करा : https://youtu.be/2IkTMFpk_oE



No comments:
Post a Comment