कुरकुरीत मांदेली फ्राय बनवण्याची पद्धत
मांदेली फ्राय बनवण्याची कृती
साहित्य:
- मांदेली
- आले
- लसूण
- धणे
- हळद पूड
- कोकम रस
- रवा
- तांदळाचे पीठ
- मीठ
- तेल
बनवण्याची कृती:
- प्रथम मांदेली कापून साफ करून घ्या.
- मीठ लावून १० मिनिट ठेवा.
- १० मिनिटानंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
- आता मिक्सर मध्ये आलं,लसूण, लाल मिरच्या, धने, हळद पूड घालून बारीक वाटून घ्या.
- धुतलेल्या माश्यांना लाल मिरची पेस्ट, कोकम रस आणि मीठ लावून १० ते १५ मिनटं ठेवा.
- १५ मिनिटानंतर कढई मध्ये तेल गरम करायला ठेवा.
- तेल गरम झाल्यावर माश्याना रवा आणि तांदळाचे पीठ लावून कढईत सोडा.
- मासे लालसर होई पर्यंत तळून घ्या.
तळलेले मासे तुम्ही भात-मच्छीकढी या बरोबर खाऊ शकता.
अधिक माहितीसाठी आमच्या युट्युब चॅनेलला अवश्य भेट द्या. रेसिपी आवडल्यास कमेंट मध्ये नक्की लिहा, चॅनेलला लाइक आणि सब्सक्राइब करा: https://youtu.be/qWRUE6DsCyQ
.
.




This comment has been removed by the author.
ReplyDelete