झटपट आणि कुरकुरीत होणारी बटर चकली रेसिपी

बटर चकली बनवण्याची कृती पाहू! त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे घेऊ.
साहित्य:
- २ वाटी तांदळाचं पीठ
- १/२ वाटी रवा
- अडीच वाटी पाणी
- २ चमचे लोणी
- १ चमचा जिरे
- १ चमचा सफेद किंवा काळे तीळ
- १/४ चमचा हिंग पूड
- १/२ चमचा मिरी पूड
- मीठ
- तेल
- प्रथम एका टोपामध्ये अडीच वाटी पाणी गरम करायला ठेवा.
- पाणी उकळल्यानंतर त्यात मीठ, जिरे, तीळ, मिरपूड, हिंग पूड आणि २ चमचे लोणी नीट ढवळून घ्या.
- गॅस मंद करून रवा आणि तांदळाचं पीठ घालून नीट मिसळून घ्या.
- गॅस बंद करून मिश्रण १० मिनिटं झाकून ठेऊन द्या. १० मिनिटानंतर पीठ एका परातीत काढून मळून घ्या.
- आता चकली साच्याला आतून थोडं पाणी लावून घ्या, पीठ भरून घ्या आणि ताटामध्ये चकली करून घ्या.
- गॅस वर कढई ठेवून तेल तापवून घ्या. तेल गरम झाल्यावर चकली मध्यम ते मोठ्या गॅस वर तळून घ्या. कुरकुरीत बटर चकली तयार.
अधिक माहितीसाठी आमच्या युट्युब चॅनेलला अवश्य भेट द्या. रेसिपी आवडल्यास कमेंटमध्ये नक्की लिहा, चॅनेलला लाइक आणि सब्सक्राइब करा: https://youtu.be/4OaBksnVv54


No comments:
Post a Comment