कैरीचा रसाळ मुरांबा बनवण्याची पद्धत

कैरीचा रसाळ मुरांबा बनवण्याची पद्धत पाहूया, त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे घेऊ.
साहित्य:
- ३ कच्च्या कैऱ्या
- ३ वाटी साखर
- १ चमचा वेलची पूड
- १ चमचा जिरे पूड
- १ चमचा लाल मिरची पूड
बनवण्याची कृती:
- प्रथम कैरीची साल काढून किसून घ्या.
- किसलेल्या कैरीच्या समप्रमाणात साखर घ्या.
- एका भांड्यामधे कैरीचा किस आणि साखर घालून नीट मिसळून घ्या.
- आणि सुती कपडा बांधून ७ ते ८ दिवस उन्हात ठेवा.
मिश्रण रोज ढवळून उन्हात ठेवा.
- ८ दिवसानंतर, साखर पूर्ण मुरल्यानंतर १ चमचा लाल तिखट, १ चमचा जिरे पूड आणि १ चमचा वेलची पूड घालून नीट मिसळून घ्या.
- आणि कोरड्या काचेच्या बरणीत भरून ठेवा.
- कैरीचा आंबट गोड रुचकर मुरांबा तयार.
अधिक माहितीसाठी आमच्या युट्युब चॅनेलला अवश्य भेट द्या. रेसिपी आवडल्यास कमेंट मध्ये नक्की लिहा, चॅनेलला लाइक आणि सब्सक्राइब करा : https://youtu.be/O763CfXOxFo


No comments:
Post a Comment