केळीच्या खोडाची पौष्टिक स्वादिष्ट भाजी बनवण्याची पद्धत

केळीच्या खोडाची पौष्टिक स्वादिष्ट भाजी बनवण्याची पद्धत पाहूया.
त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे घेऊ.
साहित्य:
साहित्य:
- १ फूट लांबीचे ३ केळीचे खोड
- २ कापलेले कांदे
- ५ ते ६ कापलेल्या हिरव्या मिरच्या
- ६ ते ७ ठेचलेल्या लसूण पाकळ्या
- १ चमचा मोहरी
- १ चमचा जिरे
- कडीपत्ता
- १/४ चमचा हिंग पूड
- १/२ चमचा हळद पूड
- १ मोठा चमचा तेल
- मीठ
- प्रथम १ फूट लांबीचे ३ केळीचे खोड स्वछ धुऊन साफ करून घ्या.
- केळीच्या खोडाच्या १/२ इंच जाडीच्या चकत्या कापून घ्या.
- चकत्या कापताना निघणारे धागे हाताने काढून घ्या.
- चकत्याचे धागे काढून झाल्या नंतर, लहान चौकोनी आकारामध्ये कापून घ्या.
- त्या नंतर पाण्यात ५ मिनिटे
पाण्यात भिजत ठेवा.
- कढई मध्ये १ चमचा तेल गरम करा.
- तेल गरम झाल्यावर मोहरी घाला.
- मोहरी तडतडल्यावर जिरे घाला.
- हिंग, कडीपत्ता, हिरवी मिरची, लसूण, कापलेला कांदा, हळद पूड आणि मीठ घालून परतून घ्या.
- आता कापलेली भाजी घालून नीट मिसळून घ्या.
- पाणी न घालता झाकण ठेवून १५ मिनिट मंद आचेवर शिजवा.
- १५ मिनिटानंतर ओल खोबर आणि कापलेली कोथिंबीर वर घालून घ्या.
- चविष्ट केळीच्या खोडाची भाजी तयार.
अधिक माहितीसाठी आमच्या युट्युब चॅनेलला अवश्य भेट द्या. रेसिपी आवडल्यास कमेंट मध्ये नक्की लिहा, चॅनेलला लाइक आणि सब्सक्राइब करा: https://youtu.be/qF_5oYs5McU




No comments:
Post a Comment