टुटीफ्रुटी आईस्क्रीम
आईस्क्रीम हे एक पॉप्युलर फ्रोजन डेसर्ट आहे जे स्पेशल समारंभा मध्ये जास्त प्रमाणात खाल्ले जाते. हे गोड आणि थंड डेसर्ट आहे.
टुटीफ्रुटी आइस्क्रीम बनवण्याची कृती पाहू, त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे घेऊ.
साहित्य:
- ४ वाटी दूध
- १ वाटी साखर
- ४ चमचे कस्टर्ड पावडर
- १ चमचा इसेन्स
- प्रथम एका भांड्यामध्ये ४ वाटी दूध घेऊन घेऊन मंद गॅस वर गरम करायला ठेवा.
- १/४ कप दुधामध्ये ४ चमचे कस्टर्ड पावडर घालून नीट मिसळून घ्या.
- दुधाला उकळी आल्यावर साखर घाला.
- साखर विरघळल्यावर दुधात मिसळलेली कस्टर्ड पावडर घालून
नीट ढवळून घ्या.
- ५ मिनिट सतत ढवळत राहा. मिश्रण थोडं जाड झाल्यावर गॅस बंद करा.
- थंड झाल्यावर आवडत इसेन्स घालून नीट मिसळून घ्या.
- आईस्क्रीम पॉट मध्ये ओतून वरून टुटीफ्रुटी
घाला आणि फ्रीझ मध्ये ८ ते १० तास ठेवा.
- टुटीफ्रुटी आईस्क्रीम तयार.
अधिक माहितीसाठी आमच्या युट्युब चॅनेलला अवश्य भेट द्या.
रेसिपी आवडल्यास कमेंट मध्ये नक्की लिहा, चॅनेलला लाइक आणि सब्सक्राइब करा: https://youtu.be/g5MCAVkS_o0



Very testy
ReplyDelete