15 मिनटात बनवा तांदळाच्या पिठाची कुरकुरीत चकली
'चकली' हा संपूर्ण भारतातील लोकप्रिय पदार्थ आहे. दिवाळीसारख्या मोठ्या सणाला चकली आवर्जून बनवली जाते. चकली हि टि-टाईम स्नॅक्स म्हणून सर्वांची आवडती आहे.
चकली विशेषतः तांदळाचं पीठ, चणा डाळ, उडीद डाळ आणि विविध मसाले घालून बनवली जाते.
सुरुवातीला आपण तांदळाच्या पिठाची कुरकुरीत चकली बनवण्याची पद्धत पाहूया. त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे घेऊ.
साहित्य:
- ४ वाट्या तांदळाचं पीठ
- दीड वाटी बेसन
- अर्धा चमचा जिरे
- २ चमचे लाल मिरची पूड
- २ चमचे तूप
- १ चमचा सफेद तीळ
- दीड लिटर पाणी
बनवण्याची कृती:
प्रथम एका टोपामध्ये दीड लिटर पाणी गरम करायला ठेवा.
पाणी उकळल्यावर अर्ध पाणी बाजूला काढून ठेवा.
आता उरलेल्या पाण्यात २ चमचे तूप घाला.
तूप विरघळले कि त्याला जिरे, लाल तिखट, मीठ आणि हळद पावडर घालून एक उकळी येऊ द्या.
कोरडं तांदळाचं पीठ आणि बेसन नीट मिसळून घ्या.
आता पीठ गरम पाण्यात घालून नीट ढवळून घ्या.
आणि १० ते १५ मिनिट झाकण ठेऊन द्या.
१५ मिनिटानंतर पीठ थोडं थोडं गरम पाणी घालून नीट मळून घ्या.
आता चकली साच्याला आतून थोडं पाणी लावून घ्या.
साच्यामध्ये पीठ भरून घ्या आणि ताटामध्ये चकली करून घ्या.
गॅस वर कढई ठेवून तेल तापवून घ्या.
तेल गरम झाल्यावर चकली मध्यम ते मोठ्या गॅस वर तळून घ्या.
कुरकुरीत चकली तयार.
अधिक माहितीसाठी आमच्या युट्युब चॅनेलला अवश्य भेट द्या. रेसिपी आवडल्यास कमेंट मध्ये नक्की लिहा, चॅनेलला लाइक आणि सब्सक्राइब करा: https://youtu.be/xraR3jvZqmY

No comments:
Post a Comment