Wednesday, 5 April 2023

केळफुलाची भाजी बनवण्याची कोकणातील पारंपरिक पध्दत

केळफुलाची भाजी बनवण्याची कोकणातील पारंपरिक पध्दत 


केळफुलांची भाजी


 सुरुवातीला आपण केळीच्या फुलांबद्दल महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. 

केळीची फुले, म्हणजेच केळफूल मोठी, गडद जांभळ्या किंवा लाल रंगाची असतात आणि त्यांचा आकार शंकूच्या आकाराचा असतो. बाहेरील पाकळ्या जाड गडद लाल रंगाच्या असतात आणि आतील भाग कोमल, सफेद रंगाचा असतो. 

चिरलेले केळीचे  फुल हवेच्या संपर्कात आल्यावर काळपट तपकिरी होते म्हणून  लिंबाचा रस किंवा पाण्यात घालून ठेवावी. 

तुम्हाला तुमच्या आहारात केळीच्या फुलांचा समावेश करायचा असल्यास, हि रेसिपी नक्की करून बघा.      

आता आपण केळफुलाची भाजी बनवण्याची पद्धत पाहूया.  त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे घेऊ.    

साहित्य:
  •   केळफुलं
  • अर्धी वाटी भिजलेले चणे
  • / वाटी ओलं खोबर
  • कापलेले कांदे
  • ते १० लसूण पाकळ्या
  • तेल 
  • मीठ 
  • चमचे गरम मसाला 
  • चमचा धने
  •  जिरे पूड


बनवण्याची कृती:


प्रथम दोन्ही तळव्यांना तेल लावून घ्या.
  
आता एक एक करून पाकळ्या उघडा.  

सफेद भाग दिसेपर्यंत पाकळ्या काढून घ्या

 प्रत्येक फुलांमधील हे दोन्ही भाग काढून घ्या

 भाजी कापून घ्या.

आतील सफेद भाग सुध्दा बारीक चिरून घ्या.

कापलेली भाजी रात्रभर पाण्यात ठेवा. 

दुसऱ्या दिवशी  पाण्यात ठेवलेली भाजी चाळणीमध्ये ओतून सर्व पाणी काढून घ्या

भिजलेले चणे धुऊन घ्या

आणि मीठ घालून कुकरमधून शिजवून घ्या

आणि एकदा धुवून घ्या. आता कढईमध्ये चमचा तेल घाला

 त्याला कापलेला कांदा आणि लसूण घाला

कांदा थोडा लालसर झाल्यावर ओलं खोबर घालून मिनिट परतून घ्या.

मिश्रण थंड झाल्यावर चमचे गरम मसाला आणि चमचा धणे  जिरे-पूड  घालून मिक्सर मधून वाटुन घ्या.

आता कढई मध्ये चमचा तेल गरम करून घ्या.

तेल गरम झाले कि छोटा चिरलेला कांदा आणि पाकळ्या बारीक कापलेली लसूण घाला.

कांदा थोडा गुलाबी झाला कि त्यात निथळत ठेवलेली भाजी, शिजलेले चणे आणि ओल्या खोबऱ्याचं वाटण घालून घ्या.

उकळलेल्या  चण्याचं  पाणी वापरून भाजी मध्यम आचेवर १५ मिनिटं शिजवून घ्या.

केळफुलांची भाजी  तयार.

अधिक माहितीसाठी आमच्या युट्युब चॅनेलला अवश्य भेट द्या.  रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाइक आणि सब्सक्राइब करा : https://youtu.be/K9pnlny8WUM


No comments:

Post a Comment

घरच्या घरी बनवा मुंबईचा फेमस वडा पाव

घरच्या घरी बनवा मुंबईचा फेमस वडा पाव       मुंबईतील काही प्रसिद्ध वडा पाव सेन्टर आहेत जे तुम्ही गूगल वर शोधू शकता .   आता आपण ...