झटपट बनवता येणारी तवा अंडा बुर्जी
अंडा भुर्जी हि एक कमी वेळेत झटपट तयार होणारी लोकप्रिय डिश आहे. अंडा भुर्जी हि सकाळच्या नाश्त्यासाठी तसेच दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात बनवू शकता. अंड्याचा वापर विविध पाककृती मध्ये केला जातो.
आता आपण तवा अंडा भुर्जी बनवण्याची पद्धत पाहूया. त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे घेऊ.
साहित्य:
- ४ अंडी
- ४ मोठे कांदे चिरलेले
- १ टोमॅटो
- ७ ते ८ कापलेल्या हिरव्या मिरच्या
- ७ ते ८ कडीपत्याची पाने
- १/४ वाटी कोथिंबीर
- १/२ चमचा धने जिरे पूड
- १/४ चमचा हळद पावडर
- १/२ चमचा मीठ
- तेल
बनवण्याची कृती:
गॅस वर तवा ठेवून २ चमचे तेल घाला.
तेल गरम झाले कि हिरवी मिरची घाला.
मिरची थोडी तळली कि त्यात कडीपत्ता आणि कांदा
घाला.
कांदा गुलाबी झाल्यावर टोमॅटो घाला.
१ मिनिटानंतर हळद, मीठ आणि कोथिंबीर घालून नीट परतून
घ्या.
चवीसाठी १/२ चमचा धने-जिरे पूड
घाला.
आता अंडी वाटी मध्ये फोडून तव्यात
घाला.
आणि २ ते ३ मिनिट मोठ्या आचेवर भुर्जी
शिजवून घ्या.
गरमागरम
झटपट
भुर्जी तयार.
एखाद्या वेळेस अंड खराब झाल्यास ते भुर्जी खराब करू शकते, म्हणून अंडी थेट तव्यावर फोडूनका. वाटीत फोडून तव्यावर घाला.
अधिक माहितीसाठी आमच्या युट्युब चॅनेलला अवश्य भेट द्या. रेसिपी आवडल्यास कमेंट मध्ये नक्की लिहा, चॅनेलला लाइक आणि सब्सक्राइब करा: https://youtu.be/WYVKaH-PlYg

No comments:
Post a Comment