Sunday, 1 August 2021

रान भाजी सर्व गुणांनी संपन्न कंटोळीची भाजी (कर्टुल ) Spiny Gourd

रान भाजी सर्व गुणांनी संपन्न  कंटोळीची भाजी (कर्टुल ) Spiny Gourd 


 कंटोळी पावसाळयाच्या सुरुवातीलाच बाजारात येते .पावसाळयात येणारी ही हिरवीगार कारल्यासारखी दिसणारी विशिष्ट फळभाजी, हि एक रानभाजी असून तिची वाढती मागणी लक्षात घेता, याची शेती जगभरात सुरू करण्यात आली आहे. आयुर्वेदात कंटोळीच्या भाजीला फार महत्व आहे. कंटोळीला सर्वात ताकदवान भाजी मानले जाते. 

आता आपण कंटोळीची भाजी बनवण्याची पद्धत पाहूया

त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे घेऊ. 


साहित्य:
  • १/२ किलो कांटोल
  •  १ कांदा
  •  ५ ते ६ लसूण पाकळ्या 
  •  ५ ते ६ हिरव्या मिरच्या
  •  मीठ 
  •  तेल   
बनवण्याची कृती:   

प्रथम कांटोल स्वछ धुवून घ्या. 

टोकाचा थोडा भाग कापून घ्या. 

मधोमध कापून दोन भाग करून घ्या. 

उभी चिरून घ्या. आत बिया असतील तर काढून घ्या.

कढई मध्ये १ मोठा चमचा तेल घालून गरम करा. 

तेल गरम झाल्यावर मिरची घाला. 

१ मिनिटानंतर कापलेला कांदा आणि लसूण घाला.

कांदा गुलाबी झाल्यावर चिरलेली भाजी घाला आणि नीट मिसळून घ्या.

मीठ घालून परत ढवळून घ्या.

झाकण ठेऊन १० ते १२  मिनिटं मंद गॅस वर शिजवून घ्या. 

भाजी शिजल्यावर किसलेलं ओलं खोबर घाला. 

चविष्ट कांटोळांची भाजी तयार.

  अधिक माहितीसाठी आमच्या युट्युब चॅनेलला अवश्य भेट द्या.  रेसिपी आवडल्यास कमेंट मध्ये नक्की लिहाचॅनेलला लाइक आणि सब्सक्राइब करा.

No comments:

Post a Comment

घरच्या घरी बनवा मुंबईचा फेमस वडा पाव

घरच्या घरी बनवा मुंबईचा फेमस वडा पाव       मुंबईतील काही प्रसिद्ध वडा पाव सेन्टर आहेत जे तुम्ही गूगल वर शोधू शकता .   आता आपण ...