Wednesday, 28 June 2023

घरच्या घरी बनवा चटपटीत रगडा पॅटीस

घरच्या घरी बनवा चटपटीत रगडा पॅटीस


रग्डा पॅटीस हे मसालेदार, गोड- तिखट अश्या खमंग फ्लेवर्समुळे सर्व वयोगटातील लोकांचे आवडते स्नॅक फूड आहे.  अश्या चटपटीत डिशचा आस्वाद तुम्ही घरच्या घरी घेऊ शकता.

  आता आपण चटपटीत रगडा पॅटीस बनवण्याची पद्धत पाहूया.  त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे घेऊ.



रगडा पॅटीस

 

 साहित्य: • भिजवलेले पांढरे वाटाणे • हळद पावडर • बडीशेप पावडर • मीठ • 1 कप कोथिंबीर पाने • १/२ कप पुदिन्याची पाने • 7 ते 8 हिरव्या मिरच्या • १/२ टीस्पून जिरे पावडर • 1/2 टीस्पून काळे मीठ • १/२ कप भिजवलेले खजूर • 1 टीस्पून चिंच • १ कप किसलेला गूळ • 1/2 टीस्पून लाल तिखट • 7 ते 8 बटाटे • तूप 
बनवण्याची कृती
रगडा बनवण्यासाठी 
  1.  प्रथम एका भांड्यात १ वाटी सफेद वाटाणे ७ ते ८ तासासाठी पाण्यात भिजत ठेवा.             
  2. भिजवलेले सफेद वाटाणे मऊ होईपर्यंत शिजवून घ्या.                                                                 
  3. शिजवताना त्यात मीठ, हळदपूड आणि बडीशेप पूड घाला.                                                           
  4. शिजल्यावर पोटॅटो मॅशरने मॅश करून घ्या. 

 


 तिखट चटणी बनवण्यासाठी
  • एका मिक्सर जार मध्ये १ वाटी कोथींबीर, १/२ वाटी पुदिनाची पाने, ७ ते ८ हिरव्या मिरच्या, १ चमचा मीठ, १/२ चमचा जिरे पूड आणि १/२ चमचा काळं मीठ घालून बारीक वाटून घ्या.

  • अश्याप्रकारे तिखट चटणी तयार करून घ्या.  

          गोड चटणीसाठी बनवण्यासाठी 


  • १/२ वाटी भिजवलेले खजूर, १ चमचा चिंच, १ चमचा मीठ, १/२ चमचा जिरे पूड आणि १/२ चमचा काळं मीठ घालून बारीक वाटून घ्या.



  • वाटलेले मिश्रण एका भांड्यात काढून  त्यात १ वाटी किसलेल गूळआणि १/२ चमचा लाल मिरची पूड घालून गॅस वर ठेवा. १० ते १५ मिनिट मंद आचेवर शिजवून घ्या.
 पॅटिस बनवण्यासाठी :

  • एका भांड्यात ७ ते ८ बटाटे उकडून घ्या. उकडलेले बटाटे थंड झाल्यावर साल काढून कुस्करून घ्या. त्यात चवीनुसार मीठ, १/२ चमचा हळद पूड आणि १ चमचा जिरे पूड घालून नीट मिसळून घ्या.
  • तयार मिश्रणाचे लिंबाच्या आकाराचे गोळे करून त्याला तळहातावर हलके दाबून पॅटिसचा आकार द्या. गॅस वर तवा गरम करायला ठेवा.  
  • तवा गरम झाल्यावर त्यावर १ चमचा तूप घाला. आणि पॅटिस दोन्ही बाजूने शॅलो फ्राय करून घ्या. 

 

रगडा पॅटीस सर्व्ह करण्याची पध्दत:
  • रगडा पॅटिस सर्व्ह करण्यासाठी एक डिश मध्ये १ मोठा चमचा रगडा घ्या, त्यावर पॅटिस ठेवा. तिखट आणि गोड चटणी घाला.   
  • चाट मसाला घाला. कापलेला कांदा आणि कोथिंबीर घाला.  
  • सजावटीसाठी वरून नायलॉन शेव घाला.  

     
  • अश्याप्रकारे रगडा पॅटिस डिश खाण्यासाठी तयार करा. 
अधिक माहितीसाठी आमच्या युट्युब चॅनेलला अवश्य भेट द्या. रेसिपी आवडल्यास कमेंट मध्ये नक्की लिहा, चॅनेलला लाइक आणि सब्सक्राइब करा: https://youtu.be/jXLUZo-BqV8

घरच्या घरी बनवा मुंबईचा फेमस वडा पाव

घरच्या घरी बनवा मुंबईचा फेमस वडा पाव       मुंबईतील काही प्रसिद्ध वडा पाव सेन्टर आहेत जे तुम्ही गूगल वर शोधू शकता .   आता आपण ...